Ad will apear here
Next
‘मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होणार’


मुंबई :
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल,’ असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाच नोव्हेंबर रोजी केले.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कोअर कमिटीची मुंबईत बैठक झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बोलत होते. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि भाजप प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष - शिवसेना महायुतीला सत्ता स्थापनेचा स्पष्ट जनादेश दिला आहे. या जनादेशाचा आदर करून आम्ही लवकरात लवकर महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार आहोत.’ 

‘सरकार स्थापनेसाठी शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तो प्रस्ताव ते लवकरात लवकर देतील. त्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची दारे २४ तास खुली आहेत. भारतीय जनता पक्ष सर्वांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या या सरकारसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही मान्यता मिळाली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड केली आहे. संपूर्ण भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभा आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होईल,’ असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZYMCG
Similar Posts
भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांनी बुधवारी (३० ऑक्टोबर) मुंबईत भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड केली. ‘राज्यातील मतदारांनी भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट जनादेश दिला असून, महायुतीचे सरकार लवकरच स्थापन करण्यात येईल आणि गेल्या पाच वर्षांत
मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसच; अजित पवार उपमुख्यमंत्री मुंबई : कित्येक दिवस चाललेल्या चर्चांच्या फैरींनंतर एका रात्रीत महाराष्ट्राच्या राजकारणाने अचानक दिशा बदलली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. आज सकाळी (२३ नोव्हेंबर) या दोन्ही नेत्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली
‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ : देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी सादर झाला. आता राज्याचा अर्थसंकल्प सहा मार्चला सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर, अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी कोणालाही मार्गदर्शक ठरेल, असे पुस्तक माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले असून, ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ असे त्याचे नाव आहे
‘आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून जाईल’ मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणे, पायाभूत सुविधांमध्ये पाच लाख कोटींची गुंतवणूक, एक कोटी नोकऱ्यांची निर्मिती, प्रत्येक नोंदणीकृत बेघराला घर, शेतीला दिवसा १२ तास वीज, प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी अशा १६ प्रमुख संकल्पनांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language